राज्यात सध्या परतीचा पाऊस जोरदार बरसतो आहे. अशात याच परतीच्या पावसामुळे परिसरही बहरला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील बहरलेली विविध जातीची फुलं विद्यार्थ्यांसह विद्यापीठात येणाऱ्यांना आकर्षित करत आहेत. त्यामुळे कास पठारासारखी दृश्य सध्या विद्यापीठ परिसरात अनुभवायला मिळत आहेत.