मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. काल अयोध्येतील महंतांनी राज ठाकरेंची शिवतीर्थावर जावून भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधानंतर आता राज ठाकरे पुन्हा अयोध्येत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.