विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत या मुद्द्यांवरून शिंदे-भाजपा सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजूनही व्यक्तिगत कामात दंग आहेत. सत्ताधाऱ्यांनी अद्याप शेतकरी आत्महत्या तसेच नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर विरोधकांशी चर्चा केलेली नाही, असा आरोप दानवे यांनी केला.
#ambadasdanve #shivsena #bjp #devendrafadnavis #eknathshinde