ज्या निवडणुकीवरुन शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं, आता तीच निवडणूक बिनविरोध करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ती म्हणजे अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक. शिवसेना आमदार रमेश लटकेंचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आणि ती जागा रिक्त झाली. त्यामुळे आता या रिक्त जागेसाठी अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा रमेश लटके तर भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीकडून मुरजी पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पण याच निवडणुकीत भाजपनं माघार घ्यावी आणि ऋतुजा लटकेंना बिनविरोध निवडून देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.