छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज चित्रपटांमधून होत असलेल्या इतिहासाच्या मोडतोडीच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली.त्यांनी त्यावेळी हर हर महादेव,वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातून इतिहासची मोडतोड होत असल्याचा आरोप केला आणि 'महाराजांच्या इतिहासाची मोडतोड खपवून घेणार नाही' असा आक्रमक इशाराही त्यांनी निर्माते-दिग्दर्शकांना दिला.