'संजय राऊत यांची बोलण्याची पातळी इतकी खालावत चालली आहे की त्याबाबत काय बोलणार? देशाचे पंतप्रधान त्यांच्या विषयी बोलताना भान बाळगायला हवं. या देशात काही राजकीय संकेत आहेत. काही सांस्कृतिक संकेत आहेत. काही सामाजिक संकेत आहेत.ज्यामध्ये आपण कुणाबद्दल बोलतो याचं भान असलंच पाहिजे' असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात म्हटलं आहे. तसंच 'देशात लोकशाहीचा अतिरेक झाला असून आपण कुणाला काहीही बोलू शकतो अशी स्थिती सध्या आहे' असंही पाटील यांनी म्हटलं आहे.