शिवसेना ( Shivsena ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला आणि 2024 पर्यंत पुन्हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. मी बाहेर असो वा नसो 2024 पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेचं रक्त स्वस्त नाही. सध्याच राजकिय वातावरण अस्थिर आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्याचं त्यांनी सांगितलं. राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आणि शिंदे गट आणि विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.
#SanjayRaut #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #MVA #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews