मंत्रालयामध्ये एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र जाळीमुळे त्याचा जीव वाचला. त्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. तिथेच तो आपल्या मागण्या काय आहेत, ते सांगत होता. त्यानंतर त्याला खाली उतरवलं.