बेकायदा बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पुण्यात काल रिक्षा चालकांनी चक्का जाम आंदोलन केले होते. पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर एकत्र येत हजारो रिक्षा चालकांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांना भेटण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांनी शिंदे यांना 'फेकू अधिकारी' म्हणत साष्टांग दंडवत घातला.