देशभरामध्ये चर्चेत राहिलेल्या गुजरात निवडणुकीचा निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागला आहे. सलग सातव्यांदा भाजपाने पंतप्रधान मोदींच्या राज्यामध्ये सत्ता राखण्यात यश मिळवलं आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. त्यातच दिल्ली महानगरपालिकेमध्ये 'आप'ने १५ वर्षांपासूनची भाजपाची सत्ता खालसा केली. या सर्व निकालांचा नेमका अर्थ काय घ्यावा यासंदर्भात सांगत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर...