पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे अमित ठाकरे यांच्या भेटीला दाखल झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी, 'माझ्या 22 वर्षाच्या राजकारणात कधी ही पक्षविरोधी काम केले नाही, मी पक्ष वाढवण्याचे काम केलं आहे.त्यामुळे हकालपट्टी होण्याचा प्रश्नच नाही.तसेच आजवर बार्गेनिंग करायच असतं तर मी ते कधीच केले असते आणि दुसर्या पक्षात गेलो असतो' अशी प्रतिक्रिया दिली.