मनसे अध्यक्ष राज ठाकरे परळीत दाखल झाले आहेत. परळीत पोहोचतात त्यांनी पांगरी येथील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. २००८ मध्ये चितावणीखोर वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद परळीत उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. यात बसचे मोठे नुकसान झाले होते. आणि आज याच प्रकरणात राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहिले आहेत.