संजय राऊत म्हणाले, "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी दिसत आहे की, आमचं ते आमचं आणि तुमचा तेही आमच्या बापाचा. परंतु आमचे मुख्यमंत्री काय करतात हा प्रश्न आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याशी महाराष्ट्राला पडलेलं नाही, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या इकडचे प्रमुख आहेत. ते बोम्मई यांना कशाप्रकारे उत्तर देतात? मुख्यमंत्री या लढ्यात उतरले आहेत की नाहीत? ते कुठे आहेत? हा प्रश्न आहे."
"कर्नाटकच्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेलं नाही. कालदेखील आमचे खासदार अमित शाहांना भेटले. 'मिंधे' सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत. बोम्मई बोलतात की, मी अमित शाहांचं ऐकणार नाही, तर मग अमित शाह कसली मध्यस्थी करणार आहेत?" असा सवाल संजय राऊतांनी विचारला.