चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यामध्ये शाईफेक झाली. पुणे भाजपाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा काढण्यात आला. यावेळी 'शरद पवार हाय हाय', 'चंद्रकांतदादा तुम आगे बढो' अशा घोषणा देण्यात आल्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मोर्चामध्ये जगदीश मुळीक,मुरलीधर मोहोळ यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
(रिपोर्टर: सागर कासार)