राज्य शासनाने कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द केला. याचे पडसाद साहित्य वर्तुळात उमटताना दिसत आहेत. साहित्यिकांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.