गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेला महाविकास आघाडीचा महामोर्चा आज मुंबईत निघाला असून त्यामुळे शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मोर्चामध्ये झालेल्या सभेदरम्यान उपस्थिती लावून भाषण केले.यावेळी त्यांनी, 'शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. राज्यपालांना हटवा नाहीतर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही'.या मोर्चाकडे बघून मला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण येत असल्याचेही पवार म्हणाले.