पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर Mukta Tilak यांचे काल निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या.आज विधानसभेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ता टिळक यांच्या आठवणींना उजाळा दिला. गणपतीच्या काळात केसरीवाड्यात गेल्यानंतर मुक्ता टिळक यांची झालेली भेट आणि आठवण यावेळी त्यांनी सभागृहात सांगितली.