मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीट केले आहे. तरुणाला धमकावल्याचा आरोप त्या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हाड यांच्याकडून करण्यात आला आहे. विरोधकांकडून शिंदे गटाच्या दुसऱ्या एका मंत्र्यावर आरोप केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ शेयर केला असून त्यात मंत्री भुसे हे तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडिओ सध्याचा आहे की जुना आहे याबाबत कोणताही खुलासा झाला नाही. परंतु आव्हाडांनी हा व्हिडिओ मागच्या काही तासांपूर्वी ट्वीटरवर टाकला आहे.
#DadaBhuse #JitendraAwhad #EknathShinde #DevendraFadnavis #WinterSession #BJP #NCP #Shivsena #HWNews #Maharashtra #Tweet #ViralVideo