आमदार रवी राणा यांनी नवा दावा करत लवकरच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर शिंदे गटात प्रवेश करतील, असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरेंचे काही शिवसैनिक त्या ठिकाणी टक्केवारी वसुल करतात. टक्केवारी वसूल करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी बीएमसीमधील कार्यालयात बसले होते. ही टक्केवारी मोडून काढली पाहिजे. तसेच 80 टक्के नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत जाणार आहेत, असं म्हणत लवकरच किशोरी पेडणेकर सुध्दा शिंदे गटात प्रवेश करतील, असं आमदार रवी राणा यांनी म्हंटलं आहे.
#KishoriPednekar #RaviRana #EknathShinde #ShivSena #BJP #Maharashtra #WinterSession #DevendraFadnavis #NavneetRana #UddhavThackeray #BMCElection #BalasahebanchiShivsena