पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित केला. 'पुण्यातील ट्रॅफिकमुळे कंपन्या बाकी राज्यांत गेल्या' असे विधान करत लवकरात लवकर या विषयी तोडगा काढावा' असे आवाहन राज्य सरकारला केले.