पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबाई यांच्या दुःखद निधन झाल्याच समजले. आम्ही सगळे त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो. पण त्यांचे आज निधन झाले. त्या समृद्ध आयुष्य जगल्या. त्यांना उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभले. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांचे संगोपन केले. मुलांना वाढवले. एखादी व्यक्ती कितीही सर्वोच्चपदी असली तरी आईचे छत्र गमावल्यानंतर ती अनाथ होते. ठाकरे परिवार, शिवसेना परिवार, महाराष्ट्राची जनता या दुःखद प्रसंगी नरेंद्र मोदी यांच्या दुःखात सहभागी आहे, अशा भावना संजय राऊत यांनी व्यक्त केल्या.