'आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचही हिंदवी स्वराज्य होतं' असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. यावरून बऱ्याच राजकीय प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. याबद्दल भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी कीर्तनाच्या शैलीतून टीका केली आहे. 'काही धर्मबुडवे लोक काहीही बोलतील पण छत्रपती संभाजी महाराज हे धर्म रक्षक, धर्मवीर सोबतच स्वराज रक्षक सुद्धा होते' असे ट्विट त्यांनी केले आहे.