प्रहार संघटनेचे नेते व आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. आज सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास अमरावती येथे बच्चू कडू यांचा अपघात झाला. सकाळी रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिल्याची माहिती आहे. अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु आहे.