राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे. सकाळी ६ वाजल्यापासून कोल्हापूरच्या कागलमधील घरावर आणि पुण्यातील घरी ईडीचं धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे मुश्रीफ समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी कागलमधील घराबाहेर गर्दी केली आहे. त्यांना मुश्रीफांनी शांततेचं आवाहन केलंय. तर, विशिष्ट जातीधर्माच्या लोकांवर जाणूनबुजून कारवाई केली जात आहे का? असा सवालही मुश्रीफांनी विचारलाय.