पुण्यात सध्या कोयता गँगची दहशत पाहायला मिळत आहे. महिलांवर देखील या गँगकडून हल्ला करण्यात आला. याची गंभीर दखल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. तसंच या प्रकरणी राज्याच्या गृहविभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.