नृत्यांगना गौतमी पाटील हिचा एक खाजगी व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी सायबर सेलशी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. तसंच याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.