कवी, गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी boycott bollywood ट्रेंडवर भाष्य केलं आहे. भारतीय चित्रपटांची आज जगभरात वेगळी ओळख आहे. आम्हाला चित्रपटांशी प्रेम आहे. गोष्ट ऐकणं आणि ऐकवणं हे आमच्या DNA मध्ये आहे. त्यामुळे भारतीय चित्रपटांचा आदर करा, असं जावेद अख्तर म्हणाले. जयपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.