कवी, लेखक जावेद अख्तर यांनी लाहोरला जाऊन पाकिस्तानच्या तोंडावर त्यांचीच धुलाई केली. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जावेद अख्तर यांचं अभिनंदन करायला हवं, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर इथे बसून पाकिस्तानला सुका दम देणं सोपं आहे, मात्र तिथून जाऊन बोलणं धाडसाचं काम आहे, असं म्हणत राऊतांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.