शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल किस्सा सांगत भाजपा आणि शिंदे गटाला जोरदार टोला लगावला.