आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त खासदार (ठाकरे गट) राजन विचारे यांनी त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्याविषयी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. आनंद आश्रमाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं यावरूनही विचारे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.