उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे गटावर आगपाखड केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांवर बोलणाऱ्यांचं कर्तृत्व काय? असा थेट सवाल करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. बाळासाहेबांचं नाव सोडलं तर यांच्याकडे आहे काय?, अशी टीकाही त्यांनी केली.