Wardha: युवकानं बनवलं हायटेक मचाण; काय आहेत सुविधा पाहा
शेतात पिकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतकरी लाकडी मचाण तयार करतात. पण ही मचाण पाहिजे तितकी सुरक्षित नसते. हीच बाब लक्षात घेत वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मुलाने सुविधायुक्त मचाण तयार केलं आहे. त्यात सुरक्षिततेचाही विचार केला गेला आहे. ही मचाण हायटेक असून सर्वांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदु बनली आहे.