राज्यात सध्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाकडून विरोधकांना आवाहन करण्यात आलं आहे. मात्र महाविकास आघाडी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अंधेरी, कोल्हापूर, नांदेड पोटनिवडणुकीची उदाहरणं देत भाजपाला टोला लगावला आहे.