Nitin Gadkari-PM Modi :संसदेत 'मोदी मोदी'च्या घोषणा,बाकडी वाजत होती, पण गडकरी अलिप्त? | Viral Video
दोन दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर झालेल्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरलं. तसेच मोदींना काही प्रश्न विचारत त्याची उत्तरं देण्याचं आव्हान दिलं. यानंतर मोदींनी संसदेत भाषण करत सरकारच्या कामांची माहिती देत विरोधकांना टोले लगावले. विशेष म्हणजे मोदींच्या या भाषणाच्यावेळी संसद घोषणांनी दणाणून गेली होती. भाजपा खासदार मोदींच्या भाषणाला दाद देत बाक वाजवत होते आणि मोदी-मोदीचा जयघोष करत होते. यात मोदींचं भाषण सुरू असताना सर्व खासदार बाक वाजवत आहेत, मात्र नितीन गडकरी या जयघोषात सहभागी होताना दिसले नाही..