Nitin Gadkari on Rahul Gandhi: "राहुल गांधींचे मनापासून आभार मानतो"; नितीन गडकरींची फटकेबाजी
राहुल गांधीनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानानंतर भाजपाकडून राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. नागपूर येथे झालेल्या गौरव यात्रेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींचे चक्क आभार मानले, राहुल गांधींमुळे आम्हाला पुन्हा सावरकरघराघरांत पोहोचवण्याची संधी मिळाली, असंच काम करत जा, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.