कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याशी पुण्यातील प्रश्न आणि समस्या यांबाबत चर्चा करण्यात आली. कसबा मतदारसंघातील सर्व प्रश्न व मूलभूत समस्या दूर करण्याचे आश्वासन यावेळी धंगेकर यांनी दिले. यावेळी बोलताना त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. 'राजकारणात कुणी चाणक्य नसतो. पुण्यातील प्रश्न मी सोडवेल अमित शाह कसे सोडवतील?. काळ येतो आणि जातो तशी मोदी लाटही सरेल' असे वक्तव्य धंगेकर यांनी केले