कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर झाली असून भाजपाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांच्यात निवडणुक होत आहे. ही निवडणुक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून भाजपाकडून हेमंत रासने यांच्या प्रचार रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले आहेत. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सह अनेक नेते मंडळी सहभागी झाले आहेत.