राष्ट्रवादी काँगेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावई यांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आपण आपल्या कुटुंबीयांची सुरक्षा करण्यास समर्थ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. व्हिडीओचा पुराव असताना देखील मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेपही केला नाही, तिथेच आपला सरकारवरचा विश्वास उडाला असंही ते म्हणाले.