'मी कालच्या वक्तव्यावर ठाम आहे'; संभाजीराजेंबद्दलच्या वक्तव्यावर Jitendra Awhad यांची प्रतिक्रिया
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं' असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यावर आज आव्हाड यांनी आज पुन्हा मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. 'शंभुराजेंनी कुठल्याही धर्मासाठी मृत्यू पत्करला नाही. मी कालच्या वक्तव्यावर ठाम आहे' असे ते म्हणाले.
#jitendraawad #sambhajimaharaj #chatrapatisambhajiraje #rashtravadicongress #congressparty #mahavikasaghadi