सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर आसाममध्ये असल्याचा दावा आसाम सरकारने एका जाहिरातीच्या माध्यमातून केला आहे. यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना याबाबत जाब विचारला जात आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. देव सगळीकडे आहे, दगडात देव आहे. टीका करणं फार सोपं आहे. आता फक्त राजकारण देवावर करायचं असेल तर त्यांनी ते करत राहावं, असं गुलाबराव पाटील म्हणाले.