नाफेड चना खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याने नोंदणी प्रक्रिया रद्द करावी लागली. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली होती. या टीकेला आमदार रवी राणांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आधीचं सरकार हे झोपलेलं सरकार होतं. मात्र शिंदे फडणवीस सरकार हे अॅक्टिव्ह सरकार असून तात्काळ दखल घेतात. मिटकरींनी वायफळ बोलणं बंद करावं, असा सल्ला रवी राणांनी दिला आहे.