'निर्लज्जम सदासुखी'; Amol Mitkari यांची Bhagat Singh Koshyari यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टोला लगावला आहे की, 'उशिरा का होईना अखेर महाराष्ट्रातील घाण गेली. महाविकास आघाडी च्या आंदोलनाला अखेर यश आले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालाच्या अभिभाषणावर महाविकास आघाडी जोरदार विरोध करणार हे भाजपाला कळल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी एकप्रकारे महाराष्ट्रातील सरकारची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न केला' अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.