नुकत्याच पार पडलेल्यामराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत ग्रीहिता विचारे या ८ वर्षीय चिमुरडीने भैरवगड कडा सर करत दैदिप्यमान कामगिरी केली आहे. मुरबाड तालुक्यातील वसलेला भैरवगड हा भल्याभल्यांना आव्हान देत असतो. तब्बल ३ हजार फुटांवर असलेला भैरवगड हा गाठण्यासाठी घनदाट जंगलातून पायपीट करत कड्याच्या पायथ्याशी पोहचावे लागते मात्र ग्रीहिताने केवळ २ तासात ही कामगिरी यशस्वी करून दाखवली.