सध्या कांद्याला रास्त भाव मिळत नसल्यानं शेतकरी नाराज आहेत. कांद्यासाठी शेतकरी व्यापाऱ्यांशी सौदेबाजी करत आहेत. असं असतानाही कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत त्यामुळे ही परिस्थिती कधी व्यवस्थित होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना पडला आहे. एका कांद्याउत्पादक शेतकरी व्यक्तीने 'आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय काय?' असं म्हणत आपली व्यथा मांडली आहे.