Devendra Fadnavis: 'नुकसानग्रस्त भागाची माहिती शासनाने मागवली आहे'; फडणवीसांचे स्पष्टीकरण

Lok Satta 2023-03-08

Views 3


अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी राज्यसरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून धारेवर धरायला सुरवात केली होती, यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'प्राथमिक माहितीनुसार सुमारे १३ ,७२९ हेक्टरवर नुकसान आहे. आणखी यासंदर्भातील अहवाल येत आहेत. मदतीचे प्रस्ताव पाठविण्याचे आदेशसुद्धा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत' याचसोबत 'राज्य सरकार शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत देणार! माझी विरोधकांना विनंती आहे की, किमान शेतकऱ्यांच्या विषयावर तरी राजकारण करू नका' असे आवाहनही यावेळी फडणवीसांनी केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS