राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात आज पोलिसांनी अनिल जयसिंघानी यांना अटक केली आहे. जयसिंघानी यांच्या अटकेवरून आता राज्याचं राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. अनिल जयसिंघानी यांना मातोश्रीवर कोण आणलं होतं, ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत हे तपासा असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे कोणाकडे निर्देश केले, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
#AdityaThackeray #EknathShinde #DevendraFadnavis #AmrutaFadnavis #BJP #Shivsena #SanjayRaut #MumbaiMetro #OldPensionScheme #AnikshaJaisinghani #Maharashtra