श्री रामनवमीच्या निमित्ताने मुंबईत ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी कार्यकर्ते जमले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी या कार्यकर्त्यांना भेटल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना शिंदे गट आणि भाजपाला टोला लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले की “तेव्हा प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन दगड टाकला, तरी तो तरंगायचा. आत्ता राजकारणात तेच झालंय. प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगतायत. तेव्हा दगडांवर पाय ठेवून लंकेत जाण्यासाठी ते तरंगत होते. आता दगडच तरंगतायत आणि दगडच राज्य करतायत. मग खऱ्या रामभक्तांनी करायचं काय? असा सवाल करत ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपाला टोला लगावला.
#UddhavThackeray #EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis #ShindeFadnavis #BJP #SupremeCourt #BhagwatKarad #ChandrakantKhaire #Maharashtra #Coronavirus #MaharashtraGovernment #SC #Politics #Maharashtra