मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळावा मध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यामध्ये राज ठाकरे यांनी नारायण राणे हे शिवसेना सोडून गेलेच नसते असा दावा केला होता. हा दावा करत असताना राज ठाकरे यांनी त्यावेळेला घडलेला प्रसंग सांगितला होता. त्यामध्ये नारायण राणे पक्षात थांबावे यासाठी तो अखेरचा कॉल असतांना मागे कोण पुटपुटत होतं यावरून जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र नितेश राणे यांनी थेट नाव घेऊनच उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. राज ठाकरे यांनी काल जे सांगितले तो मागून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे असल्याचे नितेश राणे म्हणाले.
#NiteshRane #NarayanRane #UddhavThackeray #RajThackeray #MNS #EknathShinde #DevendraFadnavis #AnilJaisinghani #SanjayRaut #Shivsena #BJP #RahulGandhi #Congress #MVA #GajananKirtikar #Politics #Maharashtra