"राजकारणात कधी काहीही घडतं"; संजय शिरसाटांच्या दाव्याने चर्चांना उधाण | Sanjay Shirsat
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मला फोन आला. राजकारणात कधीही काहीही घडतं, असं विधान शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. आठ महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंंतर ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. अशातच शिरसाट यांनी केलेल्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे