काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर अवघ्या देशासह महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. पुढील आठ दिवस स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी दिली आहे. यासह सत्याग्रह आंदोलन देखील सुरू आहे.